ग्रेस,
(माणिक सीतारामपंत गोडघाटे)
सादर प्रणाम,
पुण्यात होतो. आणि तेही एक दिवसा साठी. काम आठवत नाही पण होतो. पुण्यात असल्यावर नाटक, संगीत, अन्य काय काय मैफिल आहेत हे पाहण्याचा नाद. त्या साठी सर्वच वृतपत्रे चाळणे हा पुण्यात उतरलो कि, सकाळ सकाळचा उद्योग. वृतपत्र हाती घेतले, चाळले. बालगंधर्व ला कांही तरी विशेष होते. दुपारी तिकडे गेलो. तारीख नक्की आठवते ४ फेब्रुवारी २०१२. अचानक माझा मित्र भेटला. अरे तू ग्रेस यांना भेटायला आलास ना? मी विस्मयकारक होवून त्याच्या कडे पहिले आणि पुढे तो म्हणाला ‘दिनानाथ’ मध्ये सर आहेत.
कर्क रोगाने तुम्हाला पछाडले आहे. हे मला समजले होतेच. पण अश्यात अलीकडे मी तुम्हाला फोन केला नव्हता, पण तुम्ही आजारी आहात हे जेंव्हा मला समजले त्यानंतर माझे तुम्हाला फोन करण्याचे धाडस झाले नाही. पण आज पुण्यात आहात असे कळले आणि लगेच मोबाईल लावला. तुमची वेळ घेतली आणि तडक “दिनानाथ” गाठ्ले. शेवटच्या मजल्यावर विशेष अतिथी कक्ष्यात आलो, चौकशी करावी म्हणून पुढे सरकलो, तर उजव्या हाताला रूम उघडी होती आणि तिथे तुमचा एक फोटो लावलेला दिसला. हीच रूम असणार. डोकावून सरळ आत आलो. तुम्ही मला पाहताच नेहमीच्या आवाजात “काय महाराज २ वर्ष झाली फोन नाही, नागपूर ला आलात नाहीत का अश्यात? आणि बसण्याची सूचना केलीत. मी आतून खूप घाबरून गेलो होतो, तुमचा चेहरा, शरीर, डोळे, रंग सारे सारे बदलून गेले होते. तुम्हीच ‘ग्रेस’ आहात का? असा प्रश्न मनात पडावा इतका बदल तुमच्यात झाला होता. थोडेसे बोलणे झाले. आणि एकदम निरव शांतता पसरली. मी बोललो नाही. आणि तुम्ही एका पायावर आडी टाकून घुड्घ्यावर दोन्ही हात एकमेकांवर ठेवून कसल्या तरी गहन चिंतनात गुंतलात. हातात कसल्याश्या धातूंचे कंगन, मनगटात माळ आणि गळ्यातही असेच कांही असावे. मी स्तब्ध. तुमच्या त्या दिनानाथ हॉस्पिटलच्या स्पेशल रूम वर, मागे, पुढे नजर टाकली. भिंतीवर तुमच्या अनेक विविध भावमुद्रा असलेल्या प्रतिमा लावलेल्या, तुमची अनेक पुस्तके कपाटात लावलेली होती. तुम्हाला दिसतील आणि सारखी पाहता येतील अश्या बेताने ठेवलेली. डाव्या बाजूला तुमचे सहोदर,जीवश्यच,कंठश्च मित्र पं.हृदयनाथ मंगेशकर यांचा फोटोही लटकवलेला होता. हे पाहताक्षणी हे नागपुरातले घर आहे? असा भास थोडा वेळ झाला. चहा मागवला गेला, थोड बोलण आणि पुन्हा कसल्या तरी विचारात गुंतण अस चालू होत तुमच. मी स्तब्धच होतो. मला काय बोलावे कांहीच सुचत नव्हते. आणि नाही तरी मी जेंव्हा तुम्हाला बोलतो, तेंव्हा जुजबीच बोलत होतो, आणि साहित्य बाह्य. ‘ओल्या वेळूची बासरी’ तुमचे पुस्तक प्रकाशित होणार होते. तुम्ही मुद्रण तपासणीच्या कामात असलेल्या कोणाला तरी फोन वर बोलत होता, “ अरे माझे दिवस किती राहिले, लवकर लवकर आटोपा ३ दिवसात मला सगळे अंतिम प्रुफ हवे आहे, दिल्लीहून आलो कि लगेच ते प्रकाशित करायचे आहे”...तुम्ही फोन ठेवलात आणि माझ्या कडे वळून म्हणालात ‘लोमटे महाराज साहित्य अकादमी चा पुरस्कार जाहीर झालाय आणि या लोकांना आता उतार वयात सुचले पुरस्कार देण्याला, मी लिहिले ते काय कुठल्या पुरस्कार साठी? असा प्रश्न करून तुम्ही तुमच्या कलाकृतींवर बोलत राहिलात जे माझ्या आकलनाच्या पलीकडले होते. मधेच शांतता होती, आणि मग कालांतराने मला प्रश्न केलात, ‘तुम्हाला जर वेळ मिळाला तर माझ्या सोबत दिल्लीला याल का’? साहित्य अकादमीचा पुरस्कार घेण्यास जायचे आहे. हृदयनाथ ने कोणाला तरी सांगितले आहे सोबत यायला पण त्याचा होकार आणखी आला नाही. तो जर आला नाही तर तुम्हाला मी फोन करतो. तुम्ही चला दिल्लीला माझ्या सोबत. मी म्हणालो आनंदाने येतो मला कळवा, किंवा जो येणार आहे त्याला सांगून टाका कि तू येवू नकोस म्हणून. तुम्ही म्हणालात, पण हृदयनाथने सांगितले आहे. त्याचा निरोप येवू द्या मग पाहू...... एक तास कसा गेला कळले नाही.... मी निरोप घेतला आणि फोन ची वाट पाहीन असे सांगून खाली उतरलो. ‘दिनानाथ’ सोडले, खाली उतरून त्या इमारतीच्या उंचीकडे खिन्न मनाने पाहत होतो, मनात पुटपुटलो ......किती सहज मी तुम्हाला भेटलो. तास गेला, आणि मला दिल्ली ला सोबत येण्याचे निमंत्रण.......मी बराच वेळ हवेत होतो.......इमारती उंच असून काय उपयोग माणूस उंच असयला हवा, तुमच्या उंचीचा, ज्याला मनाचा ठाव कळला, स्वतःची उंची कळलेली, आणि कुणाच्याही उंचीची तमा नसलेले तुम्ही ग्रेस... होय ग्रेसच.
हळूच माझ्या डोळ्यात तुम्हाला पहिला फोन केलेला आणि २००२ साली पहिल्यांदा भेटलो तो दिवस चमकून गेला. अंबाजोगाईला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दरवर्षी होतो त्यात तुम्ही कवी संमेलनात यावे असे संयोजाकना वाटत होतो, संपर्क झाला, पण तुमचा होकार येण्या आधीच तुमचे नाव पत्रिकेत छापले गेले. दासू वैद्य या कवी संमेलनाचे सूत्र संचलन करणार होते. पण तुम्ही आला नाहीत, तुम्ही निघालात कि नाही? हे विचारावे म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि मग समजले कि तुम्ही यायला नकार दिला होता आणि तो ही स्पष्ट पणे. “मी कवी संमेलनाचा कवी नाही. मी कवी संमेलनाला जात नाही”. हे आवर्जून सांगितले. पण कांही तरी गडबड झाली आणि चुकून तुमचे नाव पत्रिकेत छापले गेले होते. त्यावेळी तुम्ही चार गोष्ठी सुनावल्या होत्या. मी संयोजकांच्या वतीने माफी मागितली, नंतर २००२ साली प्रख्यात साहित्यिक प्र. ई. सोनकांबळे यांचा मुलाचे डॉ. अश्विनचे लग्न नागपूरला होते. त्यानिमित्य मी नागपूरला आलो होतो. जाताना तुम्हाला भेटायचे आहे हे ठरवून निघलो. नागपूरला आल्यावर तुम्हाला फोन केला आणि भेटण्याची वेळ ठरवून घेतली. सायंकाळी ५ वाजता भेट ठरली होती. तुमच्या साहित्या बद्दल खूप चर्चा, मत-मतांतरे, होती. दुर्बोधतेचा आरोप तर प्रचलीत होता. पण स्वच्छंदी जगणारे आणि लिहिणारे ‘ग्रेस’ यांची भेट म्हणजे माझ्यासाठी तो दिवस ग्रेट होता. तुमच्या बद्दल अफवाही खूप होत्या. ग्रेस हे कोणालाच निट बोलत नाहीत, तावातावाने बोलतात. वगैरे वगैरे. मी गेलो सोबत माझा मुलगा अभिजित, भाऊ दीपक हे पण होते.. मी त्या लोकमत चौकाजवळील तुम्ही सांगितलेल्या इमारतीत मध्ये भेटायला आलो. तर दाराजवळच्या भिंतीवर लिहिले होते. “I am Free but not available” हे वाचून मी प्रथम आवाक झालो, पण भेटण्याची तिव्र इच्छा. मी भित भित बेल वाजवली... आणि तुम्ही कदाचित माझीच वाट पाहात असावेत. या या दगडूशेठ अस म्हणत तुम्ही दरवाजा उघडला आणि म्हणालात माझ्या नागपुरात दंत कथा भरपूर आहेत. मी भेट घेणाऱ्याला रागावतो, मारतो, हुसकावून लावतो, वगैरे वगैरे. तस कांही वाटत असेल तर तुम्ही लगेच जावू शकता. पण मी नम्रपणे म्हटले तसे असते तर मी आलोच नसतो. मला तुम्हाला पहायचे होते आणि प्रत्येक्ष भेटायचे होते. पूर्वी मी तुमच चर्चबेल, चंद्र माधवीचे प्रदेश, मितवा, संध्याकाळच्या कविता, सांध्यपर्वातील वैष्णवी, मृगजळाचे बांधकाम, इतर कांही वाचले होते. तुमचे साहित्य हे जे समजले ते माझे, नाही समजले ते अकलनापलीकडले आहे हे नम्र पणे सांगतो. ‘ती गेली तेंव्हा पाऊस निनादात होता’, ‘भयं इथले संपत नाही’ ही चंद्रकांत काळे यांनी निर्मिलेली ’साजणवेळा’ आणि इतर गीते आईक्लेली होती. आणि तुमच्या या गीतामुळे मी भारावलेलो होतो. तुमचे कांही लिखाण सामना मधून वाचलेले होते. तेवढाच धागा होता. पण खूप मोकळे बोललात, मधेच इंग्रजी बोलत होतात.. पण मी तुम्हाला मला इंग्रजी येत नाही हे सांगण्याचे धाडस केले नाही. ३ तास होतो, मधेच तुम्हाला फोन यायचा त्यात अर्धा तास तरी जायचा, घरात कोणही नव्हते त्यामुळे पाणी तुम्हीच आणून दिले. भित भित तुम्हाला मी म्हणालो, मला तुमच्या कविता फार आवडतात, तर मी काय करू शकतो मग? सगळ्यांनाच आवडतात. किंव्हा नाहीत आवडत. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे तुमचे सरळ बोलणे. तुम्ही फोनवर जेंव्हा बोलत होता तेंव्हा तुमच्याच साहित्याचेच बोलत होता. आणि भाषा, उच्चार, भेदक वाक्य रचना, आणि सरळ सरळ अस्खलित इंग्रजी. बापरे. मी थक्क झालो. या भेटीत तुमची कायम ओळख आणि संपर्क ठेवू असे ठरवून गेलो होतो. या भेटी दरम्यान परभणीच्या (पण आता ठाण्यात असलेल्या) अंजली आंबेकर ह्या शिक्षण अधिकारी होत्या, तुमच्या साहित्यावर त्या विलक्षण प्रेम करीत होत्या. त्यांचा तुम्हाला फोन आला आणि त्या कांही तुमच्या साहित्यावर लिहीत होत्या आणि तुमच्या साहित्याची कांही महत्वाची कात्रणे त्यांना हवी होती. तुम्ही मला परभणी किती जवळ आहे? हे विचारले आणि मला परभणीहूनच जावे लागते. असे सांगितल्यावर ती कागदपत्रे तुम्ही माझ्या कडे दिलेत. आणि सांगितले हे तु नक्की दे. नंतर अंजली आंबेकर यांचे आणि माझी मैत्री खूप छ्यान झाली. त्यांनीच मला ‘संध्यासुक्तांचा यात्रिक’ हि सीडी मिळवून दिली....मी तर खुश झालो. तुमच्याशी जवळीक साधण्याची संधी होती. तुमच्या सोबत फोटो घेवू का? असा प्रश्न करताच त्यांनी लगेच जवळ बोलावले आणि अविस्मरणीय क्षण मी टिपून घेतला.
माझ्या भेटीत तुला काय वाईट अनुभव आला? असा प्रश्न तुम्ही केलात आणि मी नकारार्थी उत्तर दिले....तुम्ही दिलेली फाईल घेवून मी निघालो. आणि तळघरा पर्यंत तुम्ही मला सोडायला आलात. आणि पुढच्या भेटीचे निमंत्रण पण दिले. नम्रता, विनयशीलता, पाहुण्याला कसे बोलावे, वागवावे, हे जणू तुम्ही शिकवत आहात असा भास...पण माणूस म्हणून तर पहिल्याच भेटीत तुम्ही मला अत्यंत आवडलात. तुमच्या बोलण्यातून दु:खाची, विरहाची आर्तता, विचारांची खोली, घरात एकटे, घर स्वतःच्या प्रतिमांनी भरलेले, अनेक छटा असलेल मोठी मोठी तुमचीच पेंटिग्ज, आधुनिक जगात वेगळाच ज्ञानाचा दिवा हतात घेतल्याचा भास मला तेंव्हा झाला. एकाकीपणाचे जगणे घरभर दिसत होते, उद्विग्नता बोलण्यातून जाणवत होती. आणि छोट्या कवितेचा तुकडा तुम्ही एका लयीत म्हणून दाखवलात. तो क्षण आजही माझ्या अंगावर शहारा आणतो, माझ्यासाठी तो एक मोठा सन्मान होता. ही तुमची माझी पहिली भेट. तुमच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा, आणि साहित्याचा अहंकार पहिल्या भेटीत नाही जाणवला पण नंतर भेटत गेलो आणि स्वतःच जगण, लिखाण, शैली, भाषा, मी इतरान पेक्षा वेगळा कवी - साहित्यिक आहे याची जाणीव मला होत राहिली.. स्वछंदी असण आणि अहंकार असण यातला फरक मला जाणवू लागला. “मी माझा उपयोग कोण्या साहित्यबाह्य माणसाला, अथवा संस्थेला होवू देणार नाही, मी माझ्या पद्धतीने कार्यक्रम करतो, आणि करून घेतो”. ही भाषा आज ही माझ्या कानात घुमते आहे.. पण तुमचे बोलणे आणि लिखाण हे अति उच्च पातळीवरचे. स्वतःच्या लिखाणाचा गर्व होता, माज नव्हता, राघव, रामदास, हृदयनाथ, सुभास, ही नावे सतत येत होती. तुमच्या देहबोलीत स्वतःच्या तत्वज्ञानाचा असर जाणवत होताच, एक लय होती. ‘मोर तुरा काढून नाचतो आहे’ असा मला उगीच भास तुमच्या त्या हावभाव व बोलण्यावरून झाला. मी इतरांसारखा नाही. माझे लिखाण समजायला शतकानुशतके लागतील, असे म्हणत आहेत असाच भास होत होता. पण माझे तुमच्या व्यक्तीमत्वात काय काय आणखी मिळेल याकडे लक्ष होते. नंतर १ महिना, १५ दिवसाला फोनवर भेटत राहिलो. १ दा खूप दिवस फोन गेला नाही ६ महिन्याचा कलावधी असावा. अचानक सायंकाळी तुमचाच फोन, काय लोमटे महाराज, पुण्याला १ श्रीमंत दगडूशेठ, आहेत तुम्ही आमचे साधे दगडूशेठ आहात. भेटा खूप दिवस झाले. प्रत्यक्ष भेट नाहीच. किमान फोन तरी करावा. “एक तर तर लळा लावू नये आणि लावला तर टाळू नये’ हे वाक्य आणखीही आठवते मला. मध्यंतरी २००९ - १०, भेटलोच नाहीत. पण २०११ मध्ये मी नागपूरला कांही कामानिमित्त गेलो पण तुम्ही १ दिवस आधीच पुण्याला गेला होतात. तुमच्या बद्दल कोणाचे कांहीही मत असले तरी. माणूस म्हणून तुम्ही जे प्रेम दिले ते शब्दाच्या बाहेर होते.स्वतःच्या निर्मितीवर आनंदी असणारे तुम्ही.
“मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल”
असे लिहिणारे तुम्ही पण मन मेणाहुनी मऊ आणि प्रसंगी कणखर झालेले अनुभवले आहे. दु:ख, आणि दु:ख तुमच्या जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत सोबत होते म्हणून तुम्ही सुंदर जीवन जगलात असे मला वाटते. माणूस म्हणून, साहित्यिक आणि कलावंत म्हणूनही तुमचे जगणे श्रीमंत होते.
“मी माझा, माझ्या भाषेचा भूतकाळ, तिचा इतिहास मिटवत नाही, पुसून टाकत नाहीये पण त्याच बरोबर भविष्यकाळाचा उरबडव्या विदुषकही मी होणार नाही.” (मृगजळाचे बांधकाम – पेज १४७) तुम्हाला दुर्बोध समजणाऱ्या लोकांना मराठी भाषेचे, तिच्या भविष्याचे किती भान होते ते या २ ओळीतून स्पष्ट जाणवते.
असतेच आपुले गाव आतल्या तिळाहुनि खोल
मी पुन्हा घराला आलो परतीचे घेवून बोल.
किंवा ..
चल आज घराला पाहू तू नसलीस म्हणुनी काय
मृत्यू मढवुनि देतो हळदीचे स्वस्तिक पाय ......(सांध्यपर्वातील वैष्णवी – ११३)
असे नाजूक हळुवार होणारे तुम्ही.....
घन जमतील तेव्हा जमतील, वाऱ्याचे अलगुज खोटे ;
हे दुःख मिठीचे तोवर हाडांना घेवून पेटे.....(वाऱ्याने हलते रान – ६८)
असे कणखर होतानाही दिसतात. ही तुमची चलबिचल जशी लिहिण्यात आहे तशी प्रत्येक्ष जगण्यातही जाणवते. राघव, मिथिला, आणि माधवी चे नाव कित्येक वेळा लिहिताना, बोलताना येते तेंव्हा तुम्ही व्याकूळ होताना दिसलात. कांही नावे सारखी तुमच्या तोंडून येत असत त्यात, रामदास भटकळ, हृदयनाथ, लताबाई, आशाताई, सुभाष अवचट, चंद्रकांत काळे, राघव, मिथीला, माधवी आणि कोणीकोणी. आपल्याच लिखाणावर बोलताना किती आवेगाने बोलत असत तुम्ही. तुम्हाला प्रत्यक्ष आयकावे म्हणून तुम्हाला सांगितले होते कि, तुम्ही कुठे मराठवाड्यात आलात कि सांगा मला जाहीर कार्यक्रमात मला यायचे आहे. योगायोगाने आपली नागपूर भेटी नंतर ३ वर्षांनी सोलापूरला भेटण्याचा योग आला. शंकरराव मोहिते यांच्या नावे पुरस्कार वितरण होते. तिथे मुद्दाम मी आलो होतो. त्र्य. वि. सरदेशमुख यांच्या आग्रहाखातर तुम्ही हा साहित्य पुरस्कार स्वीकारलात. अंबरीश मिश्र आणि स्वत:हा त्र्य. वि. सरदेशमुख यांना पण त्यात पुरस्कार होते. तुमचे ते आवेश पूर्ण भाषण आईकून मी थक्क झालो. तुम्हाला धाप लागलेली. तुमची मांडणी कित्येकांना पटली किंवा नाही कि समजलेच नाही ही शंकाच. तुम्हाला अंबाजोगाईला बोलावणे जमले नाही पण तुम्ही चंद्रकांत काळे यांचा “साजणवेळा” हा कार्यक्रम घ्या. असे सुचवले. तसे तुम्ही काळे व माझे बोलणेही करून दिले. मी आणि हृदयनाथ मंगेशकर दोघेही अंबाजोगाईला येवून माझ्या कवितेचा कार्यकम करतो. तुम्ही हृदयनाथ यांच्याशी संपर्कात रहा, पण तेही जमले नाही. तुम्ही गेला. आणि मग त्याच वर्षी नोव्हेंबर २०१२ च्या “यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात, चंद्रकांत काळे यांना बोलावले आणि तुमच्या कवितांचा “साजणवेळा” हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम चालू होता. तोच वाद्यवृंद, पं.आनंद मोडक, चंद्रकांत काळे, आणि त्यांचा चमू, धीरगंभीर पणे सगळे चालू होते लोक दाद देत होते, कधी शब्दांना, कधी रचनेला, कधी गायकीला, कधी काळे यांच्या निवेदनाला....पण माझे मन मात्र पुन्हा तुमच्या शेवटच्या ‘दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’ मधल्या भेटीकडे गेले, ...तुम्ही साहित्य अकादमीचा पुरस्कार घेवून आलात. फोनवर दोनच शब्द बोललो, सर अभिनंदन!! आणि तुमचा आवाज इतका क्षीण होता कि, काळजाचा ठाव चुकला... हो, चुकलाच! तुम्ही फेब्रुवारीत तो पुरस्कार घेतला आणि मार्च २६ ला बातम्यात कळले, मराठीतील महान कवी ग्रेस गेले. मी गडबडीने चंद्रकांत काळेना फोन केला. तेंव्हा त्यानाही कळले नव्हते. मी म्हटले त्यांचा अंत्यविधी कुठे करणार एवढे कळवा. त्यानाही अंदाज आला नाही. मी पुण्याच्या दिशेने निघालो आणि तुमचा अखेरचा प्रबास नागपूरच्या दिशेने. मला कळलेच नाही काय करावे. तुमच्या शिवाय कोणी ओळखीचे नव्हते. जेंव्हा भेट झाले तेंव्हा तुम्ही एकटेच. पण तुमचे कांही मित्र माझे झाले होते. पुण्यात पावूल टाकले आणि बातम्या पहिल्या कवी ग्रेस यांचे नागपुरात अंत्यविधी होणार. माझी दिशा चुकली होती.आणि नागपूरला पोहचणे शक्य नव्हते. सायंकाळ, साजणवेळा, सांध्य, दिवेलागण, असे साम्य शब्द कानात पडत होते कितीं प्रिय शब्द होते ते तुम्हाला आणि किती प्रिय होते सूर्याचे अस्ताला जाणे आणि परत उगवणे. पण आज सूर्य काजळी लेवून गेला तो न परतण्या साठी. ....
मी भानावर आलो, अम्बाजोगाईचा कार्यक्रम संपत आला होता..
भय इथले संपत नाही.......
ती गेली तेंव्हा रिम झिम पाउस निनादात होता....
कसल्या दु:खाने सुचते हे गाणे...
आणि मग शेवटचे ...गीत मुकुंद फणसळकर यांच्या गंभीर आवाजात....
उठा दया घना लावा निरांजने. देहातले सोने काळे झाले.......!!
माझ्या डोळ्यात तुमची दिनानाथ मधली मूर्ती स्पष्ट पणे बोलतच आहे असा भास...हो, तो भासच होता....
या पुन्हा परत एवढेच सांगतो....
तुमचा
दगडू लोमटे