Monday, July 1, 2013

ब्रम्हपुत्र

ब्रम्हपुत्र 
सादर प्रणाम,

तुझे रूप, आकार, आणि व्याप्ती मला माहित आहे, तुझा जन्म,मला कळत नसला तरी माझ्या जन्मा पासून मी तुला छ्यान समजून आहे. पाहत आहे. तुला असे वाटते का कि तू तुझा प्रवाह बदल्तेस, लोकांना हैराण करतेस? कितेकाचे संसार आपल्या कवेत घेवून तू तशीच बिनधास्त निघून जातेस. कितेकांना तू उघड्यावर टाकतेस, तरी कोणीही तुला श्राप देत नाही. सहज तुला समजून घेतात, तुझ्या घाईचा काळ म्हणजे संबंध भारत पावसाची वाट पाहतो, आणि तिकडे तू आसाम मध्ये धुमाकूळ घालतेस. गावच्या गाव आणि शहरेही तू विक्स्टून टाकतेस. तरीही तुझ्या काठावरची लोक तुला पंचारती घेवून तुझ्या स्वागतला उभे असतात, कितेक गायक, वादक तुझ्या काठावर एकाग्र होवून आपला रियाझ करतात, ब्रम्ह्पुत्रा तू आहेसच अशी, तुझा नावलोकिक आईकून आणि वाचून मी खूप आकर्षिला गेलो. तुला भेटावे म्हणून आस धरली होती मनात. मग तसा योग आला १४ वर्षा पूर्वी. मला जायचे होते मेघालयात तर तुझे दर्शन घेतल्या शिवाय कुणालाच मेघालयातच नव्हे तर संबंध पूर्वोत्तर राज्यात हि जायचे असेल तर तुझे दर्शन अनिवार्य आहे. तुला टाळून कुणालाच जावेसे वाटत नाही. तुझे आकर्षण आज ही अबाधित आहे. तू आमच्याशी कशीही वागलीस तरी आम्ही तुझे अपार उपकार मानतो. मग तुझ्या त्या आक्राळ विक्राळ रूपाचे प्रथम दर्शन झाले ते गोहात्तीत जाताना रेल्वे पुला वरून. अगोदर वाटले कुठला समुद्र आहे कि काय? पण तुझा तो संथ गतीने वाहण्याचा काळ. तुझ.निळशार पाणी पाहून मन प्रसन्न आणि धन्य झाल.जिच्या भेटीची आपण आस धरली होती ती ब्राम्ह्पुत्रा माझ्या डोळ्यात मावत नव्हती. पाहता पाहता तुला आम्ही पार केले, पण तुझा स्पर्श कधी होईल हि भावना मनात घर करून राहिली. पावसाळ्यात तुझ रूप किती वेगळ, माती, दगड,आणि कितीतरी मैला तू सोबत घेवून वेगाने जातेस तेंव्हा तुला पाहायला बरे वाटते पण मनात तू थांबत नाहीस. पावसाळा सोडून जेंव्हा नितळ,आणि संथ वाहतेस तेंव्हा तुला सोडवत नाही. तुझा स्पर्श झाला तो गोहात्तीच्या काठावर. किती छ्यान होता तुझा तो स्पर्श. आजही जाणवतो, मी परतलो तेंव्हा मला परतणे अनिवार्य होते...........
१५ वर्ष नंतर तुला पाहण्याचा मोह सुटला, विरह माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्याची आर्तता साद घालत असते. तुला पाहण्या साठी जीव आतुर झाला होता. तसे भारतात अनेक नद्या आहेत कि, मी पूर्वी, गंगा, कावेरी, कृष्णा, नर्मदा, तुंगभद्रा, बियास या नद्या पहिल्या आहेत. पण तुझे आक्राळ विक्राळ रूप मला खूप आवडते, वेड लावते. म्हणून तुला परत भेटावे या साठी परत तुझ्या दिशेने निघालो. तुझे आकाश्यातून कसे रूप आहे हे पाहण्याचा योग आला, बांगला भागातून तुला पाहताना एक विहंगम असा तुझ्या सौंदर्याचा नजारा आणि आणि गोहाटीच्या जवळ आल्यावर तुझे डोळ्यात न मावणारे रूप.....आज मात्र तू खूप शांत वाटत होतीस. १५ वर्षा पूर्वी तू किती ओथंबून वाहात होतीस. पण आता काय झाले तुला? किती खोल खोल गेली होतीस. पण वरच्या आसाम मध्ये गेलो तर तू गोहातीत खोल आणि इकडे धेमाजी-दिब्रुगड या दरम्यान तुला मी नावेतून ३ तास पार करत होतो. किती नितळ, निश्चयी, खोल आणि संथ होतीस. हे तुझे रूप मला गोहाटी पेक्ष्या जस मोहक वाटले. तुझी निळाई आणि खोली किती सुंदर होती. नावाड्या नाव हाकत होता. एक मोठी हाक त्याला द्यावी आणि मनसोक्त तुला पाहून घावे असे वाटेले.... क्षणात मी गोंधळलो.. नको. तुला त्या फेरी बोटीतून न्याहाळत न्याहाळत मी दिब्रीगड च्या बाजूने काठावर आलो. तुला स्पर्शावे असा विचार मनात येताच मी तुझ्या कवेत पाण्यात शिरलो. किती  थंड आणी आल्हाददायी अनुभव होता, असेच तासंतास बसून राहावे असे वाटले .तू तुझ्या प्रवाहाच्या झोतात दिशा बदल्तेस, तुझ्या वेगवान प्रवाहात तू कित्येक माणसाना, घरादाराना, घेवून अनेकांना पोरके करतेस या वर विश्वास बसत नव्हता. पण तुला पार करताना अनेक खुणा साक्ष देत होत्या. हे ब्रम्ह्पुत्रे, तू हवी आहेस आणखी कित्येक लाख वर्ष आम्हाला, तूच तारणार आणी मारणार आम्हाला.. तूच आमची माया, ममता, आणि तारणहार. तुझे रूप आणि तुझा रुद्र अवतार हवा हवा वाटणारा, जरा आमच चुकतंय, कांही हजारो वर्ष झाले चुकतंय. त्याची शिक्षा
आम्ही भोगतोय.  तू अशी रागावू नको,
मी आता परत जातोय. माहित नाही आता तुझी नी माझी भेट कधी होईल ती, पण तुझ्या साठी माझा जीव व्याकूळ होतो, होता आला आहे, आणि आताही व्याकुळच आहे. तुझे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून तुला कोणी टाकून बोलू नये या साठी तूच आता तुझा अवतार जरा आवरता घेता येतो का ते पहा,
जातो मी.....पुन्हा भेटीची आस धरून..... आता जाताना, तुझा स्पर्श, तुझे हे बिगर मोसमी सुंदर रूप आणि आकाशाची निळाई तुझ्या अंगावर अशीच पसरून असुदे.....ती आजन्म डोळ्यात ठेवीन...आठवण आली की, मी आभाळाच्या निळाईकडे पाहीन......
तुझा सदैव चाहता....

दगडू  लोमटे 

No comments:

Post a Comment